धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची लूट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

जसलोक, भाटिया, हिंदुजा रूग्णालयांचा समावेश

 
 
 
 
मुंबई : आर्थिकदृट्या दुर्बल घटकांना विनामूल्य रूग्णालयीन सुविधा देण्यासाठी शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. मात्र, सरकारकडून आर्थिक लाभ घेऊनही काही धर्मादाय रुग्णालये रुग्णांना त्याप्रकारची सेवा देत नसल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मुंबईतील जसलोक, भाटिय, हिंदुजा, कंबाला हिल अशा नामवंत या रुग्णालयांचा समावेश आहे.
 
सार्वजनिक न्यास संचलित या धर्मादाय रुग्णालयांनी एकूण कार्यान्वित खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्ण आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकांसाठी सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, सदर रूग्णालयांच्या पाहणीत सदर जागा आरक्षित न ठेवता त्यावर अन्य रूग्ण असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रूग्णालये रूग्णांची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवत आहेत. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावर यांनी विधान परिषदेमध्ये दिलेल्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये ही धक्कादायक गोष्ट पुढे आली आहे.
 
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीद्वारे करण्यात आलेल्या पाहणीनंतर जसलोक रुग्णालयावर फौजदारी खटला प्रविष्ट करण्यात आला असून हिंदुजा रुग्णालयाला सक्त ताकिद देण्यात आली आहे. तर कंबाला हिल आणि भाटिया रुग्णालयाला शासनाकडून देण्यात येणार्‍या सुविधा बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे येरावर यांनी सांगितले. तसेच मार्च ते मे २०१७ या कालावधीत प्रशासनाद्वारे राज्यातील ८ रुग्णालये आणि त्यांच्या औषधी भांडारांमधील बलुन कॅथॅटर आणि गायडिंग कॅथॅटरची पडताळणी करण्यात आली. यामध्ये मुलुंड, मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटल आणि प्लॅटिनम हॉस्पिटल, अंधेरी येथील ओम शांती केमिस्ट बीएसईएस हॉस्पिटल, वाशीतील हिरानंदानी हेल्थ केअर प्रा. लि., संभाजीनगर येथील मराठवाडा मेडिकल अ‍ॅण्ड रिसर्च इन्सिट्यूट कमल नयन बजाज हॉस्पिटल, नागपूर येथील वोकार्ड हार्ट हॉस्पिटल, पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल या ७ रुग्णालयांमध्ये बलुन कॅथेटर्स, गायडिंग कॅथेटर्स, डायग्नास्टिक कॅथेटर्स या मेडिकल डिवायसेसचा रुग्णांची संमती न घेता अनेक रुग्णालयांवर निर्जंतुकीकरण करून वापरल्याने त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 
आरोग्य सेवकांच्या नियुक्त्या
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवकांची नियुक्ती करण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला आहे. या अंतर्गत १ मे २०१६ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरातील धर्मादाय रुग्णालयांत एकूण ४२ धर्मादाय आरोग्यसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@