न्या. लोया प्रकरणातील वृत्त हे धादांत खोटे व विसंगत : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

सर्वोच्च न्यायालयातच ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल !

 

 
 
 
मुंबई : न्यायमूर्ती ब्रीजगोपाल लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे वृत्त हे धादांत खोटे, विसंगत आणि आपल्या मनाने लिहिलेले वृत्त असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुजरातमधील सोहराबुद्दीन खटल्याच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या डिसेंबर, २०१४ मध्ये झालेल्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी लोया यांचा मृत्यू व त्याआधी घडलेल्या घटनांबाबत तपशीलवार खुलासा केला.
 
ते म्हणाले की, मुळात हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने मी त्यावर काही सविस्तर भाष्य करणार नाही. लोया यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी सविस्तर अहवाल दिला आहे तसेच त्यांची पत्नी व सहकारी न्यायाधीशांनी दिलेल्या माहितीनुसार यात काहीही संशयास्पद आढळलेले नाही. तसेच, डिसेंबर, २०१४ मध्ये लोया यांचा मृत्यू झाला, त्यानंतर ३ वर्षांत कोणीही काही शंका घेतली नाही. मात्र, अचानक एका ‘कारवान’ नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे अचानक शंका घेतल्या जाऊ लागल्या. स्वतः न्या. लोया यांच्या कुटुंबीयांनीच आमचा या मृत्यूबाबत कोणताही संशय नसून मृत्यूचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे वृत्त धादांत खोटे, विसंगत आणि मनाने लिहिलेले आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून तिथे लवकरच याचा निर्णय होईल. यातून ‘दुध का दुध, पानी का पानी’ स्पष्ट होईल, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
 
@@AUTHORINFO_V1@@