शाळांच्या विलीनीकरणाचे आठ प्रस्ताव शिक्षण समितीने परत पाठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

प्रशासनाचा डाव उधळला


 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या घटल्यामुळे या शाळांचे जवळच्या शाळेत विलिनीकरण करून दर्जेदार सुविधा देण्यात येतील असे कारण देत पालिका प्रशासनाने तब्बल आठ प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मांडले होते. परंतु नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत याला विरोध केला त्यामुळे अखेर हे आठही प्रस्ताव परत पाठविण्यात आले. खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा डाव नगरसेवकांनी उधळला आहे.
 
 
या शाळांच्या सद्यस्थितीचा सविस्तर अभ्यास केल्यानंतरच हे प्रस्ताव पुन्हा आणावेत व एका एका प्रस्तावावर निर्णय़ घेण्यात यावेत, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी यावेळी दिले. दरम्या्न विलिनीकरणाच्या प्रस्तावामध्ये चार मराठी शाळांसह तेलगू - १, गुजराती - १, तामीळ - १, कन्नड एक अशा शाळांचा समावेश आहे.
 
मुंबई महापालिकेच्या शाळातील पटसंख्या घटल्यामुळे या शाळांचे जवळच्या शाळेत विलिनीकरण करून दर्जेदार सुविधा देण्यात येतील असे कारण देत पालिका प्रशासनाने तब्बल आठ प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मांडला. यापूर्वी पालिका शाळांची स्थिती सुधारण्यासाठी आणि पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
 
परंतु पटसंख्येचे कारण देत शाळांच्या थेट विलिनीकरणाचा घाट प्रशासन का घालते असा सवाल यावेळी शिवसेनेने केला. यावेळी विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही विलिनीकरणाच्या प्रस्तावाला जोरदार विरोध करीत सविस्तर प्रस्ताव आणण्याची मागणी लावून धरली. तसेच अनेक ठिकाणी शाळांची जागा खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी शाळा बंद करण्याचे कारस्थान केले जात असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या शाळांचे विलिनीकरण करण्याआधी पटसंख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ते यावर विचार करून नंतरच निर्णय घ्या, असे निर्देशही गुढेकर यांनी यावेळी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@