महिला बचत गट, बेरोजगार संस्था व दिव्यांगांसाठी वाहनतळे राखीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

सुधार समितीची प्रस्तावाला मंजुरी

 
 
 
 
मुंबई : मुंबई महानगर पालिका शहरात वाहने उभी करण्यासाठी सशुल्क वाहनतळे उभारते. या वाहनतळांचे व्यवस्थापनाचे काम पूर्वी कंत्राटदारांना दिले जात होते परंतु आता महिला बचत गट, बेरोजगार संस्था व दिव्यांगांसाठी काही वाहनतळे राखीव ठेवण्यात येणार आहेत. याबाबतच्या धोरणाला आज सुधार समितीने मंजुरी दिली आहे.
 
मुंबईमध्ये सध्या ९१ वाहनतळे आहेत या वाहनतळांवर ११ हजार वाहने उभी केली जातात. याच्या व्यवस्थापन कंत्राटदार करत होते. हे कंत्राटदार ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या धोरणात बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महिला बचत गट, बेरोजगार संस्था व दिव्यांगांना हे काम दिले जावे अशी नगरसेवकांची मागणी होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने जुन्या कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत काढत ५० टक्के वाहनतळाचे कंत्राट महिला बचत गटांसाठी, सुशिक्षित बेरोजगार संस्थांसाठी २५ टक्के तर अपंगांच्या संस्थांना ३ टक्के वाहनतळे व्यवस्थापन करण्यासाठी देण्यात यावी असे प्रस्ताव सुधार समितीकडे मंजुरीसाठी सादर केले होते.
 
बुधवारी संपन्न झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता वाहनतळांचे व्यवस्थापन करण्यासाठी महिला बचत गटांसाठी २५ टक्के, सुशिक्षित बेरोजगार संस्थांसाठी २५ टक्के तर अपंगांच्या संस्थांना ३ टक्के वाहनतळे राखीव ठेवली जाणार आहेत. सुधार समितीनंतर पालिका सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@