महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘जागतिक ऑप्टोमेट्री दिन’ साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : ’शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा व आपुलकीची जाणीव लक्षात घेऊन नेत्रतंत्रज्ञ निर्माण करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी ’जागतिक ऑप्टोमेट्री दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात केले. या अनुषंगाने विद्यापीठात आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी श्री आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक जाधव, डॉ. दीपांजली लोमटे उपस्थित होते.
 
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, ’’समाजातील अनेक लोक अंध व डोळ्यांसंबंधी विकाराने बाधित आहेत. आजही ग्रामीण व दुर्गम भागात अज्ञान व अंधश्रद्धा यामुळे नेत्रविकारांवर तात्काळ उपचार उपलब्ध होत नाहीत. सर्वसामान्यांना नेत्रचिकित्सा विषयाचे शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यापीठातर्फे डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री व डिप्लोमा इन ऑप्थॉल्मिक सायन्स अभ्यासक्रम सुरू आहेत. मुख्यालय व विद्यापीठाचे औरंगाबाद विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आला असून अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक जाधव यांनी सांगितले की, ’’ऑप्टोमेट्री हे दृष्टीसंवर्धनाचे उत्तम करियर आहे. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्याद्वारे समाजसेवा करण्याची संधी सर्वांना उपलब्ध आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध नेत्रचिकित्सा व उपचार केले जातात. सर्वसामान्य लोकांना या सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेला अभ्यासक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
या कार्यक्रमात विद्यापीठातील ऑप्टोमेट्री विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@