डेटाचोरीचे प्रकरण कॉंग्रेसच्या अंगलट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

केंब्रीज अॅनालिटीकाची कॉंग्रेससाठी काम करत असल्याची कबुली


 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डेटा चोरीचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेसचा डाव आता त्यांच्यावर उलटला आहे. भाजपवर आरोप करणारा कॉंग्रेस पक्ष आगामी २०१९ च्या निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी भारतीय नागरिकांचा डेटा परदेशामध्ये नेत असल्याचे उघड झाले आहे. डेटाचोरी प्रकरणी भारताच्या कारवाईनंतर केंब्रीज अॅनालिटीका या संस्थेने आपण कॉंग्रेससाठी करत असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस खोटारडेपणा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे.
 
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वतः याविषयी माहिती देत कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड केला आहे. रविशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटाचोरी प्रकरणी भारताने कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर ब्रिटेनच्या संसदीय समितीने केंब्रीज अॅनालिटीकाची चौकशी करण्यास सुरुवात केली. या चौकशीमध्ये केंब्रीज अॅनालिटीकामध्ये कार्यरत असलेल्या व ज्याने या प्रकरणात विसल-ब्लोअरची भूमिका पार पाडली त्या क्र‍िस्टफर याने आपण भारतीयांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती गोळा करत असल्याचे मान्य केले. तसेच यासाठी भारतीय कॉंग्रेस पक्षाने आपल्याला 'हायर' केल्याचे देखील त्याने कबुल केले आहे. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर केंद्र सरकारने कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.






 
राहुल गांधी आणि कॉंग्रेसने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी देशाची खूप मोठी फसवणूक केली आहे, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान सोशल मिडियावर देखील या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.




 
 
@@AUTHORINFO_V1@@