बेस्ट घेणार वातानुकूलित ४० मिडी बस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : बेस्ट प्रशासन केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत विजेवर चालणाऱ्या वातानुकूलित ४० मिडी बस भाड्याने घेणार आहे. या बससाठी बेस्टला प्रतीकिमि २८ रुपये खर्च येणार आहे. दरम्यान यापूर्वीच विजेवर चालणाऱ्या वातानुकूलित ४० बस भाड्याने घेतल्या आहे.
 
केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत बेस्टने आपल्या ताफ्यात ४० मिडी वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी ह्या बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार असून केंद्र सरकारतर्फे प्रत्येक बसगाडीमागे ६० टक्के अनुदान बेस्टला मिळणार आहे . संपूर्णपणे विजेवर चालणाऱ्या या मिडी बस असून या वातानुकूलित बस एम पी इंटरप्रायझेस बेस्टला पुरवणार.
 
दरम्यान यापूर्वीच विजेवर चालणाऱ्या वातानुकूलित ४० बस भाड्याने घेण्यास बेस्टने मान्यता दिली आहे. फेम इंडिया योजनेअंतर्गत आणखी १०० बस खरेदी करण्यासाठी बेस्टने आपला प्रस्ताव दिला होता. मात्र ४० बसगाड्यांनाच संमती मिळाली असून एका बसची किंमत सरासरी १ कोटी ६७ लाख रुपये आहे त्यातील १ कोटी रुपये बेस्टला अनुदान स्वरूप मिळणार आहेत. म्हणजे एकूण ४० कोटी रक्कम बेस्टला मिळणार आहे. या बसच्या बॅटरीचा खर्च हा या बसच्या किंमतीच्या ६० टक्के आहे. तसेच या बसगाडीवर आयात केलेल्या महागडे भाग बसविले असून हे तंत्रज्ञान भारताला नवीन आहे व या बसच्या आयुर्मानाबद्दल अनिश्चितता असून या बसगाड्या दुरुस्त्या करण्यासाठी बेस्ट कडे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने बेस्ट ने या बसगाड्या स्वतः खरेदी न करता भाडेतत्वावर घेण्याचे ठरविले आहे.
 
जुन्या मीटरमुळे बेस्टला २० टक्के नूकसान
 
बेस्टच्या वीज विभागाला फायदा मिळत आहे. परंतु गेल्या काही वर्षात वीज विभागाच्या फायद्यात घट होत आहे. जुन्या मीटरमुळे २० टक्के नुकसान होत आहे त्यामुळे बेस्ट प्रशासन एक लाख नवे मीटर घेणार आहे. बेस्टने तीन लाख मीटर घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु पैशांची कमतरता असल्यामुळे एक लाख मीटर घेता आले.
 
@@AUTHORINFO_V1@@