वॉर्नर आणि स्मिथला आयपीएलमध्ये 'नो एंट्री' ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |


मुंबई :
बॉल टेंपरिंगमुळे अडचणीत आलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्या यंदाच्या आयपीएल प्रवेशावर रोक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आयपीएलचे संचालक राजीव शुक्ला यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल मिळावा, यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला एक पत्र पाठवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून शुक्ला यांच्या पत्राचे उत्तर आल्यानंतर या दोघांच्या आयपीएल प्रवेशाबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्वतः शुक्ला यांनी आज स्पष्ट केले आहे. दरम्यान स्मिथने राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार पदाचा देखील राजीनामा दिला असून त्या ऐवजी अजिंक्य राहणे याला संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या रविवारीच या विषयी आपण निर्णय घेतला असल्याचे शुक्ला यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. परंतु वॉर्नर आणि स्मिथ या दोघांचा आयपीएलमध्ये या अगोदरच लिलाव झाल्यामुळे या दोघांना यंदाच्या आयपीएलमध्ये घ्यावे कि नाही, अशी द्विधावस्था सध्या झाली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डला यासाठी एक पत्र पाठवण्यात आले असून त्यांच्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयसीसीबरोबर देखील चर्चा सुरु असून आयसीसीने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर या दोघांच्या आयपीएल प्रवेशासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी आज पुन्हा एकदा जाहीर केले.

शुक्ला यांनी रविवारी केलेले ट्वीट :


गेल्या रविवारी स्मिथ आणि वॉर्नर यांनी बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे अनुक्रमे आपल्या कर्णधार आणि उपकर्णधार पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांच्यावर काही सामन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय देखील आयसीसीकडून घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर आयपीएलमध्ये ते खेळणार का ? असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला होता. परंतु यावर लगेच निर्णय घेणार नसल्याचे शुक्ला यांनी स्पष्ट केले होते.

@@AUTHORINFO_V1@@