किम जोंग उन 'चीन' दौऱ्यावर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |

बीजिंग : आपल्या आक्रमक धोरणांमुळे नेहमी जागतिक स्तरावर चर्चात राहणारा उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे यंदा तो आपल्या चीन दौऱ्यामुळे जागतिक राजकारणात आणि माध्यमांमध्ये चर्चा विषय बनला आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी किम जोंग उन चीनला 'सरप्राईज व्हिसीट' देत असल्याची चर्चा सध्या संपूर्ण जगभर सुरु आहे. उत्तर कोरियामधून एक रेल्वे सध्या चीनकडे निघाली आहे. ही रेल्वे सध्या अत्यंत वेगाने चीनची राजधानी बीजिंगच्या दिशेने जात आहे. या रेल्वेमध्ये उत्तर कोरियाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सशस्त्र सैनिक आहेत. त्यामुळे किम जोंग उन हा या रेल्वेमधून चीनी राष्ट्राध्यक्षांच्या भेटी निघाल्याची चर्चा जागतिक माध्यमांमध्ये रंगत आहे. उत्तर कोरियाकडून देखील किमच्या चीन दौऱ्याला दुजोरा देण्यात आला आहे. परंतु त्यांची तारीख आणि वेळ मात्र जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे उत्तर कोरियाच्या या रेल्वेने सर्वांनाच 'सरप्राईज' केले आहे.



विशेष म्हणजे माध्यमांमधील या वृत्तांमुळे जागतिक राजकारणात देखील एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः अमेरिका आणि जपान हे दोन देश बातम्यांमुळे थोडे दचकले आहेत. किम जोंग उन याची चीन भेटी ही नक्की होणार आहे का ? आणि झाली तर त्यामागे नेमके उद्देश काय असतील ? यावर सध्या या दोन्ही देशांमध्ये चर्चा रंगत आहे.
@@AUTHORINFO_V1@@