जेव्हा सुषमा स्वराज करतात काँग्रेसचं ट्वीट, रिट्वीट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |

 
आजच्या काळात वैचारिक चर्चा आणि वादविवाद करण्याचे सर्वात मोठे ठिकाण ट्विटर आहे. अगदी सरकारी पातळीवर देखील याचा मोठ्याप्रमाणात वापर होताना दिसतो. राजकारणासाठी प्रभावी वापर होता असलेल्या ट्विटरवर एखाद्या नेत्याने आपल्या विरोधी पक्षाचे ट्वीटला रिट्वीट करणे म्हणजे मोठी बाब मानली जाते.
 
 
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच त्यांचा वैचारिक तसेच राजकीय विरोधी असलेल्या काँग्रेस पक्षाचे एक ट्वीट, आपल्या टाईम लाईनवरून रिट्वीट केला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून पोलिंग सर्व्हे केला आहे. त्यात जनतेला विचारण्यात आले होते की, इराकमध्ये झालेल्या ३९ भारतीयांच्या हत्या म्हणजे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मोठे अपयश आहे का? या सर्व्हेला ७६% नेटीझन्सनी नकारार्थी उत्तर दिले आहे.
 
 
 
#indiaspeaks नावाच्या हॅशटॅग अंतर्गत काँग्रेस पक्ष नवनवीन सर्व्हे ट्विटरवर घेत असतो. मात्र यावेळी स्वत: काँग्रेसवरच हा सर्व्हे उलटला असून. काँग्रेसने सुषमा स्वराज यांच्यावर लावलेला आरोप जनतेने खोडून काढला आहे. त्यामुळे स्वत: सुषमा स्वराज यांनी काँग्रेसचे हे ट्वीट, रिट्वीट केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@