मालकांच्या परवानगीशिवाय जमीन अधिग्रहण नाही - महसूलमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, अहमदाबाद डहाणू चौपदरीकरण, पालघरमधून जाणा-या बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यातील जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. मात्र, या जमिनी मालकांच्या परवानगीशिवाय अधिग्रहण केल्या जाणार ऩसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
 
महत्वाच्या प्रकल्पांना ग्रामसभेच्या परवानगीची अट राज्यपालांनी एका अधिसूचनेद्वारे काढून टाकली असली तरी जिल्हाधिकारी यांची परवानगी आणि जमीन मालकांच्या परवानगी शिवाय जमीन अधिग्रहित करता येत नसल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या नागरिकांना योग्य तो मोबदला दिला जाणार असून विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच मिळालेल्या भरपाईची ६५ टक्के रक्कम भरल्यास पर्यायी जमीनदेखील उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले. आतापर्यंत ६५ टक्के जमिनी अधिग्रहीत झाल्या असून सुमारे 90 टक्के जमिनींचा ताबा मिळाल्यावर या प्रकल्पांच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@