कर्नाटक निवडणुकांची आज होणार घोषणा ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |


नवी दिल्ली : देशभरात सध्या चर्चा विषय बनत चाललेल्या आगामी कर्नाटक निवडणुकांचा तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून यामध्ये निवडणुकांसंबंधी एक महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणुकांची तारीख जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सकाळी ११ वाजता आयोगाने आपल्या मुख्य कार्यालयामध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी सर्व पत्रकारांना आयोगाने निमंत्रण पाठवले आहे. तसेच निवडणुकीसंबंधी या परिषदेमध्ये महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. दरम्यान येत्या एप्रिल-मे महिन्यामध्ये कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये कर्नाटक निवडणुकांसंबंधीच महत्त्वाची सूचना करण्यात येऊ शकते, अशी अटकळ अनेकांकडून बांधली जात आहे.


कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी आता काही काळच बाकी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. संपूर्ण देशात कर्नाटक हे एकमेव मोठे राज्य सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे याठिकाणी देखील आपली विजयाची गुढी उभारण्यासाठी सध्या भारतीय जनता पक्ष सर्व जोर लावत असल्याचे दिसत आहे. तसेच भाजपच्या दक्षिण दिग्विजयासाठी कर्नाटक विजय हा अत्यंत महत्त्वाचा असून कर्नाटक विजय हा भाजपचा दक्षिण भारतात प्रवेशासाठीची गुरुकिल्ली देखील ठरू शकते. त्यामुळे सध्या संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@