कर्नाटक येथे भाजपच विजयी होणार : अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  कर्नाटक येथे निवडणुकांच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. कर्नाटक येथे भारतीय जनता पक्षच विजयी होणार यावर आम्हाला ठाम विश्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केले. आज कर्नाटक येथे निवडणुकींच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
 
 
 
 
यावेळी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्यावर टीका केली. तसेच लिंगायत समाजामध्ये भेदभाव निर्माण करण्यासाठी आणि केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी त्यांनी लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याबाबत भाष्य केले. हे सगळे निवडणुकीच्याच आधी का? २०१३ मध्ये जेव्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, तेव्हा सिद्धारामैय्या कुठे होते? असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित केला आहे. 
 
 
यावेळी त्यांनी कर्नाटकातील शेतकऱ्यांना आश्वासन देत, कर्नाटकात भाजपचे सरकार आल्यानंतर ते शेतकरी हितासाठी कार्य करेल असे सांगितले.  
 
येत्या १२ मे या दिवशी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार असून त्यानंतर लगेच १५ मे रोजी मतमोजणी घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ओ.पी.रावत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटक निवडणुकांसंबंधी सविस्तर माहिती दिली. येत्या मे महिन्यामध्ये कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत असून मे महिन्यामध्येच कर्नाटकातील २२४ विधानसभा जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार असल्याचे रावत यांनी सांगितले. तसेच ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे, त्यामुळे आता कर्नाटक राज्यात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@