'स्पिरिच्युअल सिटी' वाराणसी आता 'स्मार्ट सिटी' बनत आहे : राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |

गंगेचे घाट आता अधिक सुंदर दिसतात : रामनाथ कोविंद


 
 
वाराणसी : आतापर्यंत स्पिरिच्युअल सिटी असलेली वाराणसी आता स्मार्ट सिटी बनत आहे. वाराणसीमध्ये होणाऱ्या विकासकामांमुळे नागरिकांचे जीनवमान सुसह्य होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. उत्तर प्रदेश सरकारच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आज रामनात कोविंद यांच्या वाराणसी येथे हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर राष्ट्रपती कोविंद यांचा हा पहिलाच दौरा आहे.
 
 
काशी विश्वनाथ यांच्या नगरीमध्ये राष्ट्रपती म्हणून येण्याची माझी ही पहिलीच वेळ. हा अनुभव माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय आहे. आज उद्घाटन होणाऱ्या महामार्गांमुळे वाराणसी आणि आसपासच्या क्षेत्रात दळणवळणाच्या सुविधा अधिक चांगल्या व सुगम होतील. तसेच यामुळे स्थानिकांचे जीवन अधिक सुसह्य होईल आणि विकासाच्या अनेक नव्या संधी लोकांना उपलब्ध होतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
वाराणसीने यापूर्वी राज्याला अनेक मुख्यमंत्री दिले मात्र वाराणसीचा खासदार प्रथमच देशाचा पंतप्रधान झाला आहे आणि वाराणसीच्या लोकांसाठी गौरवाची बाब आहे असे सांगत कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. खासदार म्हणूनही नरेंद्र मोदी वाराणसीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात असे कोविंद म्हणाले. वाराणसीची वैभवशाली परंपरा पाहण्यासाठी देशोदेशीचे राष्ट्राध्यक्ष येत असतात. गेल्या वर्षी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि नुकताच फ्रान्सचे राष्ट्रपती येथे आले होते अशी आठवण कोविंद यांनी सांगितली. तसेच अध्यात्म आणी ज्ञानाच्या या नगरीविषयी मला विशेष प्रेम आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मी या नगरीवर लिहिलेले पुस्तक भेट म्हणून दिले ते याचसाठी असे कोविंद म्हणाले.
 
 
वाराणसी शहर प्राचीन काळापासून गंगानदीवर विकसित झालेल्या जलमार्गांच्या सहाय्याने तसेच विविध मार्गांनी उत्तर भारताला पूर्व भारताशी जोडत आलेला आहे. गंगा नदी संस्कृती आणि सभ्यतेबरोबरच व्यापार आणि विकासालाही प्रवाहित करत आलेली आहे अशा शब्दांत त्यांनी गंगा नदीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरु असलेल्या नमामि गंगे अभियानामुळे व स्वच्छ गंगा अभियानामुळे आता गंगेचे घाट अधिक सुंदर दिसतात अशा शब्दांत कोविंद यांनी नमामि गंगे उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या कार्यासाठी त्यांनी वाराणसीच्या जनतेचे अभिनंदनही केले.
 
 
वाराणसीतील प्रतिभाशाली लोक या शहराचा सांस्कृतिक आत्मा तसाच ठेवून लवकरच या शहराचा आधुनिकतापूर्ण कायाकल्प करतील असा मला विश्वास आहे. हे आध्यात्मिक शहर विकासाच्या अनंत संधींचे शहर म्हणूनही प्रतिष्ठित होईल अशी आशा राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.
 
  
 
@@AUTHORINFO_V1@@