हाय, मी राहुल गांधी..! माझ्या अॅपवरील सर्व डेटा मी सिंगापूरच्या मित्राला देतो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |

राहुल गांधी यांच्या आरोपाला भाजपचे प्रत्युत्तर

 
राहुल गांधी यांच्या अधिकृत अॅपवरील सगळा डेटा सिंगापूरच्या एका कंपनीला दिला जातो, असा आरोप भाजपच्या आयटी सेलने केला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अॅपवरील माहिती अमेरिकेत दिली जात असल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर भाजपतर्फे देण्यात आले आहे.
 
 
हाय, माझे नाव राहुल गांधी आहे. मी भारताच्या सर्वाधिक जुन्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. तेव्हा तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर नोंदणी करता, तेव्हा ही सगळी माहिती मी माझ्या सिंगापूरच्या मित्राला देत असतो, असा अगदी राहुल गांधी यांच्या शैलीत, मात्र पुराव्या सहित ही माहिती भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर त्यांच्या अॅपच्या लॉगइनची माहिती शेअर केली आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अॅपवरील माहिती अमेरिकेतील कंपनीला दिली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी २५ मार्च रोजी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आज भाजपने त्यांच्या अॅपवरून शेअर होणारी माहितीचे तपशील ट्विटरवर शेअर केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@