उत्तर कोरियाकडून धोका कायम : अमेरिकन सुरक्षा सल्लागार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |




वॉशिंग्टन डी.सी. : 'उत्तर कोरियाने अमेरिकेला दिलेले आश्वासन हे पोकळ असून उत्तर कोरीयापासून अजून देखील धोका कायम आहे' असे वक्तव्य अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केले आहे. अमेरिकेतील एका माध्यमाला दिलेल्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते.

'उत्तर कोरिया सध्या घाबरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उ.कोरियावर टाकलेल्या दबावामुळे उ. कोरिया घाबरला आहे. त्यामुळे स्वतःला अधिक मजबूत आणि शक्तिशाली करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून त्यांनी अमेरिकेबरोबर चर्चेसाठी पुढाकार घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अद्याप धोका कायम असून उत्तर कोरियाच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष्य ठेवले पाहिजे' असे मत त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मांडले.

तसेच उत्तर कोरिया बरोबरच्या अमेरिकेच्या जुन्या संबंधांवर देखील त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. बराक ओबामा यांचा आपल्या शत्रूवर वचक कमी होता. त्यामुळे उत्तर कोरियाने अणु चाचणी करून आज इतपर्यंत मजल मारली आहे. परंतु ट्रम्प यांच्या निर्भीड वृत्तीमुळे मात्र उत्तर कोरिया अस्वस्थ झाला आहे, असे त्यांनी म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@