मध्यप्रदेश येथे पत्रकाराचा मृत्यु, हत्या की अपघात ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |

 
 
भिंड (म.प्र.) :  मध्यप्रदेश येथे एका पत्रकाराच्या मृत्युच्या घटनेने सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्यप्रदेशच्या भिंड येथे आज सकाळी एका ट्रक ने पत्रकार संदीप शर्मा यांना चिरडल्याची घटना घडली आहे. मात्र हा अपघात नसून ही हत्या असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या बाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. संदीप शर्मा हे एका वृत्तवाहिनीसाठी कार्यरत होते आणि काही वाळू माफियांविरोधात त्यांनी वार्तांकन केले होते. त्यामुळे त्यांची हत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


संदीप शर्मा यांनी या आधी देखील पोलिसांना आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. आज सकाळी गाडीवर जात असताना एचानक एका ट्रक ने धडक देत त्यांना चिरडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या आधी बिहार येथे देखील दोन पत्रकारांचा संशयास्पद मृत्यु झाला, त्यानंतर मध्यप्रदेश येथे घडलेल्या या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविरोधात नागरिकांना समाज माध्यमांवरुन तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@