प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या कारला अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |
 

 
देहरादून :  गेल्या काही दिवसांपासून भारताचा प्रसिद्ध गोलंदाज मोहम्मद शमी याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. आधी पत्नीच्या आरोपांमुळे चर्चेस आलेले मोहम्मद शमी यांच्या गाडीला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला असून टाके लावावे लागले आहेत. देहरादूनहून दिल्लीला परत येत असताना हा अपघात झाला.
 
कार आणि ट्रक यांच्या धडक झाल्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये शमीच्या डोक्याला बऱ्य़ापैकी दुखापत झाली. त्याला १० टाके लावावे लागले आहेत. देहरादून येथून क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण करून शमी दिल्लीला परत येत असताना हा अपघात घडला. शमी सध्या देहरादून येथे आहे.
 
गेल्या काही दिवसांआधी विवाहेर संबंधांमुळे शमीचे नाव चर्चेस आले होते. मोहम्मद शमी यांच्या पत्नी हसीन जहाँ यांनी त्यांच्या चारित्र्यावर मोठे आरोप लावले होते, तसेच त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शमी यांच्या व्हॉट्सअॅपचे काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले होते.
 
शमी देहरादून येथे आयपीएलसाठी सराव करत होते. यंदाच्या आयपीएल सामन्यांमध्ये शमी दिल्ली डेअर डेव्हिल्स संघातून खेळणार आहेत. आधी त्यांच्या पत्नीच्या आरोपांमुळे आणि आता या अपघातामुळे त्यांचे आय़पीएल मधील स्थान डगमगत असल्यासारखे दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@