चीनच्या हालचालींवर सैन्याचे बारीक लक्ष : सीतारामन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |

 

डेहराडून : भारत-चीन सीमेजवळील डोकलामच्या पठारावर सुरू असलेल्या चीनच्या हालचालींवर भारत सरकार आणि भारतीय सैन्याचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे डोकलाम प्रश्नी कोणीही आणि कसलीही चिंता करू नये, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केले आहे. डेहराडून येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
 
 
 
गेल्या वर्षी डोकलाम येथे भारत-चीन यांच्यात झालेल्या सीमावादानंतर डोकलाम येथील भारतीय लष्कर हे अधिक सावध झाले आहे. तसेच गेल्या वर्षभरात येथील लष्कराच्या आधुनिकीकरणाकडे देखील अधिक लक्ष्य दिले गेले आहे. त्यामुळे डोकलाम येथे कसलीही परिस्थिती उद्धभवली तरी देखील भारतीय लष्कर त्या परिस्थितीवर मात करण्यास समक्ष आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे देशवासीयांनी याप्रश्नी कसलीही चिंता करू नये, असे देखील त्यांनी म्हटले.
 
 
गेल्या वर्षीच्या जून महिन्यांमध्ये चीनने सिक्कमजवळील डोकलाम पठारावर घुसखोरी करून त्याठिकाणी रस्ते बांधण्यास सुरुवात केली होती. यावर भारतीय लष्करांनी डोकलाममध्ये जाऊन चीनचे काम बंद पाडले होते. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ दोन्ही देशांमध्ये डोकलाम सीमेवरून तणाव निर्माण झाला होता. यानंतर दोन्ही देशांनी यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली लावला होता. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी चीनने पुन्हा याठिकाणी रस्ते बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशभरातून यावर चिंता व्यक्त केली जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@