ऑस्ट्रेलिया बॉल टेंपरिंग : स्टीव्ह स्मिथ याचा कर्णधार पदाचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |

टीम पेन सांभाळणार कर्णधारपदाची जबाबदारी


केपटाऊन : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर लागलेल्या बॉल टेंपरिंगच्या आरोपानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. स्मिथबरोबर संघाचा उपकर्णधार असलेल्या डेविड वॉर्नर याने देखील आपल्या उपकर्णधार पदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतला असून यापुढे टीम पेन हा संघाच नेतृत्व करणार आहे, अशी घोषणा ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या केपटाऊन येथे कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यातील चेंडूबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज कॅमेरोन बेनक्रॉफ्ट आणि वॉर्नर हे चेंडूबरोबर छेडछाड करत असल्याचे सामन्या दरम्यान कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. सामना संपल्यानंतर बेनक्रॉफ्ट याने आपला गुन्हा कबूल केला होता. कर्णधार स्मिथने देखील यावर प्रतिक्रिया देत 'बॉल टेपरिंग' केल्याचे कबुल केले व त्यानंतर आज स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनीही आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पेन हा यापुढे सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल.
 

@@AUTHORINFO_V1@@