राहुल गांधी यांच्या 'एनसीसी' बद्दल वक्तव्यावरुन समाजमाध्यमांवर 'वादळ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |

 
 
कर्नाटक :  राहुल गांधी या न त्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या अनेक विधानांमुळे समाज माध्यमांवर त्यांच्याविषयी नाना प्रकारच्या चर्चा करण्यात येतात. त्याचप्रमाणे आज देखील त्यांच्या एका वक्तव्यामुळे समाज माध्यमांवर वादळ उठले आहे. कर्नाटक येथे झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी नॅशनल कॅडेट कोर' अर्थात 'एनसीसी' बद्दल असलेले अज्ञान उघड केले, आणि त्यावर समाज माध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
 
 
 
 
 
कर्नाटक येथे आयोजित एका कार्यक्रमात एका एनसीसी केडेटने राहुल गांधी यांना, 'एनसीसीची सी सर्टिफिकेटची परीक्षा पास केल्या नंतर तुम्ही आम्हा केडेट्स ना काय सुविधा देवू शकाल ? " असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत राहुल गांधी यांनी 'एनसीसी आणि त्याच्या इतर गोष्टींबद्दल मला फारसं काही माहीत नाही, त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मी देवू शकत नाही." असे उत्तर दिले.
 

 
 
 
देशाचा पंप्तरधान होण्याचे स्वप्न बघणाऱ्या व्यक्तिला, काँग्रेस सारख्या पक्षाच्या अध्यक्षांना एनसीसी विषयी माहिती नाही हे दुर्दैव आहे, अशा पद्धतीच्या अनेक प्रतिक्रिया समाज माध्यमांवर दिसून आल्या. "देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या संरक्षण संस्थेविषयी राहुल गांधी यांना माहित नाही 'एनसीसी आणि इतर गोष्टी' असे त्यांनी संबोधले हे अत्यंत दुर्दैव आहे. एका मोठ्या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला हे माहिती असायला पाहिजे." अशा भावना संजना सिंह या एनसीसी केडेटने व्यक्त केल्या आहेत.
 
भारतीय जनता पक्षाने देखील राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@