यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी बांधवांच्या हितांसाठी : 'मन की बात' मध्ये पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या हितांना लक्षात ठेवून तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित भाव मिळावा, शेतकऱ्यांना आधी स्थानीय बाजारपेठेत ग ग्लोबल मर्केटमध्ये देखील उचित स्थान मिळावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधनाता ते बोलत होते.
 
 
 
 
 
 
महात्मा गांधी यांच्या सार्धशती वर्षाला कसे साजरे करायचे ?
 
यंदाचे वर्ष महात्मा गांधी यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष आहे. भारत सरकारचे स्वच्छ भारत अभियान तर सुरुच आहे, मात्र आणखी असे काय करता येईल ज्यामुळे आपण महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करु शकू, त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करता येईल असे आपल्याला काहीतरी करावे लागले. असे म्हणत त्यांनी नागरिकांना यासंबंधी सल्ला विचारला आहे. तसेच या कार्यक्रमाचा लोगो काय असेल व स्लोगन अर्थात घोष वाक्य काय असेल याविषयी देखील त्यांनी नागरिकांचे सल्ले मागवले आहे.
 
 
 
 
 
 
'प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर' विषयी जागरुकता आवश्यक :
 
आपल्या देशात 'प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर' विषयी जागरुकता पसरवणे अत्यावश्यक आहे. 'प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर' अर्थात आपल्या आरोग्याची काळजी घेणे. यासाठी स्वस्थ राहणे या विषयावर आता अधिक भर देण्यात येत आहे. 'फिटनेस आणि वेलनेस' आताच्या जीवनशैलीसाठी खूप आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
 
आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयारी सुरु करा :
 
आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी १०० दिवसांहूनही कमी वेळ उरला आहे. गेल्या तीनही वर्षात २१ जून हा योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे. केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेर देखील अनेक देशांनी भारताचे भरभरून कौतुक केले आहे. त्याप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला पूर्ण उत्साहासह हा दिवस साजरा करायचा आहे, आपल्या संपूर्ण परिवारासह आपल्याला या दिनासाठी आपले योगदान द्यायचे आहे, असे म्हणत त्यांनी नागरिकांना प्रोत्साहित केले.
 
 
 
 
 
डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीकडे वाटचाल :
 
अनेक वर्षांआधी डॉ. बाबा साहेब आंबेडकरांनी देशात औद्योगिकीकरणाचे स्वप्न बघितले होते, जेणे करुन प्रत्येकाला रोजगाराच्या समान संधी मिळतील. त्यांच्या या स्वप्नाच्या पूर्तेतसाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपण देशात औद्योगिकीकरण उभे करत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
वैश्विक अर्थ व्यवस्थेत भारताचे नाव उंचावले :
 
आज भारत वैश्विक अर्थव्यवस्थेत नवीन उच्च शिखर गाठतंय. संपूर्ण जगात सगळ्यात जास्त 'एफडीआय' म्हणजेच परदेशी थेट गुंतवणूक भारतात येत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा दिवसेंदिवस विकास होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@