पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 3D त्रिकोणासन बघितलं का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशवासियांना योगासनांसाठी प्रेरित केले आहे. योगा म्हणजे केवळ आसनेच नाही तर ती जीवनशैली आहे, असे मोदी यांनी नेहमीच म्हटले आहे. दरवर्षी २१ जून रोजी ते संपूर्ण जगासमोर स्वत: योग सादर करतात. मात्र यंदा त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने योगासने सादर केली आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक 3D व्हिडियो समाज माध्यमांवर 'व्हायरल' होत आहे, ज्यामध्ये ते त्रिकोणासन सादर करत आहेत.
 
 
 
 
 
#FitIndia या हॅशटॅग अंतर्गत त्यांचा हा व्हिडियो व्हायरल होत आहे. केंद्र सरकार मधील अनेक मंत्र्यांनी हा व्हिडियो आपापल्या खात्यांवरुन हा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान थ्रीडी स्वरूपात त्रिकोणासन सादर करत आहेत. यामुळे नागरिकांना योगासनं शिकणं आता सोपं होईल, असे अनेकांनी म्हटले आहे.
 
 
 
 
 
फिटनेस आणि वेलनेस या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, असे आजच पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात सांगितले. त्यामुळे आपण त्यांच्या या मंत्राचे आचरण करत आपल्या आयुष्यात योगाला एक विशेष स्थान देवू असे म्हणत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
 
 
 
 
 
याच प्रमाणे आपल्या आयुष्यात फिटनेस एक महत्वाचा भाग आहे, असे म्हणत केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी देखील हा व्हिडियो शेअर केला आहे. पंतप्रधानांना एका वेगळ्या स्वरूपात बघितल्यामुळे या व्हिडियोविषयी समाज माध्यमांवर भरपूर चर्चा आहे.
@@AUTHORINFO_V1@@