जम्मू काश्मीर येथे पुन्हा एकदा चकमक, एक दहशतवादी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |

 
 
बडगाम : जम्मू काश्मीर येथे पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जम्मू काश्मीरच्या बडगाम भागात आज सकाळी ही घटना घडली. यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे.
 
सुरक्षा रक्षकांना दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी तपास अभियान राबविले. या तपास अभियानात झालेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षकांना एक दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. सुरक्षा रक्षकांना बघताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. य़ा गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.
 
या दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि दारुगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी कुठला होता तसेच कुठल्या संघटनेसाठी कार्य करत होता या बद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
 
गेल्या वर्षभरात सुरक्षा रक्षकांनी १९० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यातील ८० दहशतवादी हे स्थानिक असून ११० दहशतवादी हे पाकिस्तानी होते. या वर्षी देखील वर्षाच्या सुरुवाती पासूनच जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. तसेच अनेक तपास अभियानांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांची माहिती जवानांना मिळत आहे.
@@AUTHORINFO_V1@@