लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांचा कारावास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018
Total Views |
 

 
 
रांची : चारा घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली. दुमका कोषागार प्रकरणी यादव यांना आज रांचीच्या सीबीआय विशेष न्यायालयाने ६० लाख रूपयांचा दंड आणि १४ वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
 
यापूर्वी चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले असून त्याबाबतीत शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरील हा चौथा आरोप होता. झारखंडमधील दुमका येथील कोषागारातून त्यांनी बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा होता.
 
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांना एका गुन्ह्यासाठी ७ वर्षे तुरुंगवास आणि ३० लाख रुपयांचा दंड आणि फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी ७ वर्षे तुरुंगवास आणि ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे एकत्रितपणे १४ वर्षांचा तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड ठोठवण्यात आला असल्याचे सरकारी वकील विष्णु शर्मा यांनी सांगितले.
 
तसेच दंडाची संपूर्ण रक्कम न भरल्यास आणखी एका वर्षाची शिक्षा यादव यांना भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाने या प्रकरणात आणखी १८ जणांना शिक्षा सुनावली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@