आज आहे "हा" विशेष तास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018
Total Views |
 

 
 
 
पुणे : उर्जा बचत आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारतासह आज संपूर्ण जगभरात अर्थअवर पाळला जाणार आहे. आजच्या दिवशी ठराविक वेळापुरते सर्वांनी दिवे बंद ठेऊन वीज बचत केली जाते. त्यानुसार आज भारतात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ८.३० ते ९.३० हा अर्थ अवर पाळला जाणार आहे. यासाठी देलेल्या वेळेत सगळ्यांनी दिवे बंद ठेऊन यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अर्थअवर इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
उर्जाबचत आणि पर्यावरणासंबंधीत जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड वाईड फंड (WWF) या ऑस्ट्रेलियातील संस्थेने २००७ पासून अर्थअवर पाळण्याची संकल्पना सुरु केली. भारताबरोबरच परदेशांमध्येही वीजटंचाई आणि वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्या जाणवत आहेत. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाशी निगडीत वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. तसेच या उपक्रमामध्ये भारताची नेहेमीच सक्रीय राहिला असून यात आतापर्यंत १७८ देशांनी सहभाग नोंदवला आहे.
 
संपुर्ण शहरात, देशात एक तास वीज पूर्णपणे बंद...!!! पण याच एका तासात आपण जगभरातून कितीतरी वीज वाचवू शकतो जी भविष्यात पुढच्या पिढीला उपयोगी पडेल. त्यामुळे पुढील पिढीसाठी ही उर्जा टिकवून ठेवण्यासाठी अर्थ अवर साजरा करणे ही काळाची गरज आहे.
 
या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वतःहुन पुढाकार घेत आज शनिवारी (दि. २४) सायंकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवावा.
 
@@AUTHORINFO_V1@@