राज्यसभा निवडणुका - उत्तर प्रदेशात भाजपने करून दाखवलं

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018
Total Views |

 
उत्तरप्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये एकूण १० जागांपैकी ९ जागेवर भाजप उमेदवार, तर १ जागेवर सपाचा उमेदवार जिंकून आला आहे. गोरखपूर आणि फुलपूर येथे झालेल्या भाजपच्या पराभवानंतरची ही निवडणूक प्रतिष्ठेची मनाली जात होती.
 
 
एकूण १० जागांपैकी ८ जागी भाजप उमेदवारांचा आणि एका जागी सपा उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात होता, मात्र ९ व्या जागेसाठी कुणाची सरशी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. समजवादी पक्ष आणि बसपा यांच्यात झालेल्या युती नुसार नववी जागा त्यांच्यासाठी सोडण्यात आली. त्यावर बॅलेट पेपर पद्धतीने मतदान देखील घेण्यात आले होते.
 
 
 
भाजप तर्फे अनिल अग्रवाल आणि बसपा तर्फे बी.आर. आंबेडकर यांच्यात लढत होती. मात्र अनेक बसपा आमदार, आणि इतर पक्षांच्या आमदारांनी देखील भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे, मायावतींच्या बसपाला पराभवाला सामोरे जावे लागले. हा विजय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रणनीतीमुळे मिळू शकला आहे, अशी माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे. गोरखपूर आणि फुलपूर पोटनिवडणुकांची कसर येथे भरून काढल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
 
 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, अशोक वाजपेयी, विजय पाल सिंह तोमर, डॉ. अनिल जैन, जीव्हीएल नरसिंहा राव, कांता कर्दम, सकल दीप राजभर, हरनाथ सिंह यादव, आणि अनिल अग्रवाल असे विजयी भाजप उमेदवारांची नवे आहेत. तसेच सपा तर्फे जया बच्चन यांची निवड झाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@