राज्यसभेत भाजप बळकट; मात्र बहुमतापासून दूरच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018
Total Views |

 
राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. त्यात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २९ जागांवर विजय मिळवला असून, ९ जागी काँग्रेसची सरशी झाली आहे. या निकालानंतर भाजप राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असून सध्या ६८ राज्यसभा खासदार एवढे संख्याबळ भाजपचे आहे.
 
 
या सोबतच रालोआचे एकूण ८६ सदस्य राज्यसभेत आहेत. हे संख्याबळ अन्य आघाडींच्या तुलनेने सर्वाधिक असले तरी देखील राज्य सभेत एकहाती बहुमताच्या आकड्यापासून अजून ही दूरच आहे. सद्यस्थितीत काँग्रेसप्रणीत संपुआचे ६८ खासदार राज्यसभेत आहेत. त्याचाबरोबर डाव्या आघाडीचे ७, तृणमूल काँग्रेसचे १३, अण्णाद्रमुकचे १३, सपा ११, बसपा ४, आप ३, तेलगु देसम पक्ष ६, तेलंगाना राष्ट्र समिती ६, आणि अन्य १४ असे संख्याबळ आहे.
 
 
राज्यसभेच्या एकूण २४५ जागा आहेत. ज्यात पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी १२६ चा आकडा गाठावा लागतो. सध्या भाजप प्रणीत रालोआमध्ये भाजप ६८, जदयु ६ , शिवसेना ३, अकाली दल ३, पीडीपी २, रीपाई(आठवले गट) १, अन्य ३ असे एकूण ८६ खासदार एवढे संख्याबळ आहे. एकूण २४५ जागांपैकी ८ जागा राष्ट्रपती नियुक्त सदस्यांसाठी राखीव असतात.
 
@@AUTHORINFO_V1@@