कॉंग्रेस लोकसभेचे कामकाज होऊच देत नाही - अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018
Total Views |


आसाम : कॉंग्रेसने गदारोळ थांबवून काम चालू करावे आणि भाजपा सरकारवर अविश्वासदर्शक ठराव पारित करवून दाखवावा असे खुले आव्हान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज कॉंग्रेसला दिले. आसामची राजधानी गुवाहाटी येथे बूथ समिती अध्यक्ष यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कॉंग्रेस फक्त लोकसभेत गोंधळ सुरू ठेवते आणि कामकाज होऊ देत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपाचा उद्देश हा सर्व ठिकाणी एकच आहे आणि तो म्हणजे सबका साथ सबका विकास पण, कॉंग्रेसचे तसे नाही त्यांचा उद्देश फक्त ईशान्य भारताचे भाग करून त्यावर राज्य करणे हाच आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.

येत्या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपा ईशान्य भारतात २१ जागांवर निवडून येईल असा आपल्याला विश्वास आहे. कारण गेल्या दहा वर्षांमध्ये कॉंग्रेसने आसामसाठी काही विकासात्मक काम केलेच नाहिये.

पंतप्रधानांनी २०१४ साली दिलेल्या वचनानुसार आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारताचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. याच अनुषंगाने ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्व निवडूकांमध्ये बूथ अध्यक्षाची महत्वाची भूमिका असते. त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टी त्रिपुरा, मणिपूर आणि आसाममध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ शकली आहे. तसेच भ्रष्टाचाराविरूध्द केलेल्या कारवाई बद्दल आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांचेही त्यांनी अभिनंदन यावेळी केले.


@@AUTHORINFO_V1@@