राज्यसभेच्या २५ जागांसाठी मतदानाला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018
Total Views |


नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, प.बंगाल, कर्नाटक आणि तेलंगणा या सहा राज्यांमधील राज्यसभेच्या २५ जागांसाठी आज मतदान घेण्यात येणार आहे. राज्यसभेमध्ये देखील बहुमत मिळवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सध्या प्रयत्न करत असून भाजपला रोखण्यासाठी विरोधक देखील कंबर कसून कामाला लागलेले आहेत.


आज सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजता मतदान प्रक्रिया संपणार असून त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये या निवडणुकांसंबधी विविध चर्चा सध्या रंगत आहे. भाजपला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. आजचा राज्यसभेचा विजय हा भाजपसाठी आणि विरोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून या निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाल्यास लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील भाजपकडे अधिक जागा आणि बहुमत असणार आहे. त्यामुळे आजची निवडणूक भाजप आणि विरोधकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. 


विशेष म्हणजे राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठी यंदा मतदान घेण्यात येणार आहे. परंतु यातील ३३ जागांवर या अगोदरच काही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून यात भाजपचे तब्बल १७ उमेदवार राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. तसेच आजच्या २५ जागांपैकी आणखीन ११ जागांवर भाजपचा निर्विवादपणे विजयी होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे राज्यसभेत देखील भाजपला बहुमत मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून विरोधकांसाठी आजचा दिवस देखील खऱ्या अर्थाने परीक्षेचाच म्हणावा लागणार आहे.

इतिहास पहिल्यांदाच भाजप ७० जागांवर ?

राज्यसभेत सध्या भाजपचे ५८ खासदार आहेत. त्यातील १४ खासदारांचा कार्यकाळ येत्या एप्रिल आणि मे महिन्यात संपत आहे. त्यामुळे भाजपचे फक्त ४४ खासदार राज्यसभेत राहणार आहेत. त्यामुळे सध्या बिनविरोध निवडून आलेले १७ आणि आजच्या अपेक्षित ११ जागांवर भाजप विजयी झाल्यास इतिहास पहिल्यांदाच भाजपकडे राज्यसभेत ७० जागांचे बहुमत असेल, तसेच लोकसभेनंतर भाजपचा हा आणखीन एक मोठा राजकीय विजय ठरेल. .

@@AUTHORINFO_V1@@