युकी भांबरी मियामी मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018
Total Views |
 
 
 
भारताचा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू युकी भांबरी मियामी मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. बोस्नियाच्या मिर्झा बासिकला मात देत त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. युकीने बासिकला ७-५ आणि ६-३ अशा अंकाने मात दिली आहे.
 
भारतासाठी ही एक अत्यंत गौरवाची बाब आहे. भारताच्या डेविस कप खेळाडू म्हणजेच भांबरीचा पुढील सामना जागतिक पातळीवर ११ व्यास्थानावर असलेल्या अमेरिकी खेळाडू जॅक सॉक याच्या सोबत होणार आहे.
 
जागतिक पातळीवर भांबरीचे स्थान १०७ वे आहे. मात्र गेल्या काही काळापासून भांबरी उत्तम खेळाचे प्रदर्शन करत असून, त्याच्या पुढील सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. युकी भांबरीचा एकूण खेळ बघता भारताला आणखी एक पदक लवकरच मिळणार असे दिसते
@@AUTHORINFO_V1@@