नागझिरा येथे भीषण आग, वन्यजीवन विस्खळित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018
Total Views |

 
गोंदिया :  गोंदिया येथील नागझिरा व्याघ्र प्रकल्पात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेची हानी झाली आहे, तर संपूर्ण वन्यजीवन विस्खळित झाले आहे. या आगी मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र यामुळे वन्य जीवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
 
तेंदुपत्यासाठी ही आग लावण्यात आली आहे का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तेंदुच्या पानासाठी मजुरांनी आग लावली असल्याच्या संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
 
आगीच्या कारणाची माहिती मिळताच वन विभागातर्फे योग्य ती कारवाई केली जाईल, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे अधिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@