भारताच्या इलावेनिल वालारिवन हिला नेमबाजीत सुवर्ण पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
सिडनी : सिडनीमध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोट्स फेडरेशन अर्थात ‘आयएसएसएफ’च्या जूनियर विश्वचषक स्पर्धेत भारताच्या इलावेनिल वालारिवन हिला नेमबाजीत सुवर्ण पदक मिळाले आहे. महिला गटाच्या १० मीटर एअर रायफल गटात इलावेनिल वालारिवन हिने सुवर्ण पदक मिळविले आहे.
 
 
 
१८ वर्षांची इलावेनिल वालारिवन ही पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिने २४९.८ गुणांसह ही फेरी जिंकली आहे. या स्पर्धेत सुवर्ण मिळविणारी ही पहिलीच १८ वर्षीय भारतीय कन्या ठरली आहे. त्यामुळे तिने हा नवा विश्वविक्रमाच प्रस्थापित केला आहे.
 
 
शेवटच्या फेरीत इलावेनिल वालारिवन आणि चीनची तैपई लिन यिंग-शिन यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. मात्र याचा सामना करत इलावेनिल वालारिवन हिने तैपई लिन यिंग-शिन हिला मागे टाकत या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. शेवटी तैपई लिन यिंग-शिन हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर चीनच्या १८ वर्षीय वाँग जेरुने या स्पर्धेत २२८.४ गुणांसह कांस्य पदक मिळविले. 
 
@@AUTHORINFO_V1@@