फ्रांस येथे दहशतवादी हल्ला, २ नागरिकांचा मृत्यु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018
Total Views |

 
 
फ्रांस :  फ्रांस येथे बाजारात दहशतवादी हल्ला झाला आहे. या गोळीबारात २ नागरिकांचा मृत्यु झाला आहे. पोलिसांनी हा हल्ला दहशतवादी असल्याचे सांगितले आहे. इसिसने हा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
 
 
 
 
फ्रांस येथे दहशतवाद्यांनी नागरिकांना बंधक बनविले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात २ नागरिकांचा मृत्यु झाला. हल्ल्याच्या ठिकाणी तात्काळ दहशतवादविरोधी पथक पोहोचले असून ते परिस्थिती हाताळत आहेत, असे फ्रान्स सरकारकडून सांगण्यात आले आहे.
 
फ्रान्समध्ये एकाचवेळी हिंसाचाराच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या आहेत. ट्रीबीस येथील सुपरमार्केटमध्ये हल्लेखोर घुसलेला असताना तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कारकाससोन्नी येथे एका पोलिसावर गोळीबार करण्यात आल्याची दुसरी घटना घडली आहे.
 
या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने रेड अर्लट जारी केलाय. यामुळे फ्रांस येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. फ्रान्सच्या पंतप्रधानांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले असून अंतर्गत मंत्री गेरार्ड कोलाँब हे तात्काळ ट्रिबीसला रवाना झालेत.
@@AUTHORINFO_V1@@