'यंग इंडिया'ला १० कोटींचा दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018
Total Views |



नवी दिल्ली :
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'यंग इंडिया' कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आज दंड ठोठावला असून येत्या चार आठवड्यांच्या आत 'यंग इंडिया'ने हा दंड जमा करावा, असे निर्देश देखील दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दिल्लीचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. रवींद्र भट आणि ए.के.चावला यांनी या विषयी सुनावणी केली. यंग इंडियावर आयकर विभागाकडून लावण्यात आलेल्या २४९ कोटी रुपयांच्या दंडावर यंग इंडियाने न्यायालयाकडे रोक (स्टे) लावण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने आयकर विभागाचे आरोप आणि कागदपत्रांची पुन्हा एकदा छाननी करून यंग इंडियावर आणखीन १० कोटी रुपयांचा दंड लावला.

तसेच दंडाची रक्कम ही दोन टप्प्यांमध्ये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दंडातील ५ कोटी रुपयांची रक्कम ही येत्या ३१ तारखेच्या आत जमा करावी, तसेच उरलेली रक्कम १५ एप्रिलच्या आत न्यायालयात जमा करावी, असे आदेश न्यायालयाने यंग इंडियाला दिले आहेत. याच बरोबर या प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या २४ एप्रिल करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@