मोर्णा स्वच्छतेसाठी नागरिकांची 'गंगाजळी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |


अकोला : अकोला शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलकरांकडून मोठ्या प्रमाणात मदती 'गंगाजळी' जमा होऊ लागली आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पंड्ये यांच्या आवाहनानंतर मोर्णा विकासासाठी जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदतसाठी हात पुढे केले आहेत. तसेच नदी काठी लाखो रुपयांची कामे देखील करून देण्याचे आश्वासन अनेकांनी दिले आहे.

मोर्णा नदीच्या स्वच्छतेविषयी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंड्ये यांनी नागरिकांनी मोर्णा नदी स्वच्छतेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. गेल्या जानेवारी महिन्यामध्ये मोर्णा स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक मोहीम सुरु करण्यात आली होती. याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप मिळवून दिले. त्यामुळे मोर्णाची दखल आज देशस्तरावर घेतली जाते आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले. तसेच राज्य सरकारने देखील याची दखल घेत मोर्णा विकास कामासाठी १५ कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे. परंतु हा निधी येण्यास वेळ लागणार आहे, तो पर्यंत नागरिकांनी मोर्णा विकासासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंड्ये यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनानंतर अकोल्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मोर्णासाठी आर्थिक मदत केली. अनेक दानशुर व्यक्तींनी मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केले. यामधून आतापर्यंत २० लाख रुपयांहून अधिक रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@