मनोहर पर्रीकरांबद्दलचा "तो" संदेश खोटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
मनोहर पर्रीकर यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी समाज माध्यमांवरुन त्यांच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी यासाठी अनेक संदेश पाठवले. मात्र गेल्या काही दिवसांपासून मनोहर पर्रीकर यांच्या नावानी एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी "आज असाध्य अशा कर्करोगाशी झुंझ देत असताना आपलं निरोगी आयुष्य जगण्याचं राहूनच गेलं." असा आशय लिहीला आहे.

 
 
 
हा संदेश एक सकारात्मक भाव उत्पन्न करणारा आहे. रोगाने आपल्याला ग्रासण्याच्या आधीच आपले आयुष्य मनसोक्त जगा असे सांगणारा हा संदेश आहे. या संदेशातून नक्कीच चांगले काहीतरी शिकायला मिळते.. मात्र हा संदेश खोटा आहे. हा संदेश मनोहर पर्रीकर यांनी लिहिलेला नाही. केवळ त्यांच्या नावानी हा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. मराठीतून व्हायरल झालेला हा संदेश केवळ इंग्रजी भषेतील स्टीव्ह जॉब्स यांच्या संदेशाचे भाषांतर आहे.
 
 
 
 
काही काळाआधी जेव्हा स्टीव्ह जॉब्स यांना देखील कर्करोगाने ग्रासले होते. त्यावेळी त्यांनी एक अत्यंत भावनात्मक संदेश लिहिलेला. त्यांनी "आपण आयुष्यभर खूप पैसा कमावला, आयुष्य भर खूप यश मिळवले. मात्र आज मृत्युशैय्येवर असताना आयुष्यातील खरा आनंद आपण घेतलाच नाही, असे वाटते. आपण गाडीसाठी वाहन चालक ठेवू शकतो, घरी नोकर चाकर ठेवू शकतो, मात्र रोगाने ग्रासले असताना आपल्या वाटचं सहन करण्यासाठी आपण कुणालाच नेमू शकत नाही. स्वत:चे भोग स्वच:लाच भोगावे लागतात." अशा आशयाचा संदेश लिहिला होता.
 
 
 
 
 
 
वरील संदेशातील काही शब्दांचे फेर बदल करत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावावर हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. मात्र अशा आशयाचा कुठलाही संदेश मनोहर पर्रीकर यांनी स्वत: लिहिला नाही.
 
 
त्यामुळे समाज माध्यमांवर येणारे संदेश कितीही सकारात्मक आणि प्रेरणादायी असले तरी ते दरवेळी सत्यच असतील असे नाही. हे संदेश पडताळून पाहण्याची जबाबदारी सुजाण नागरिकांनी पार पाडली पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@