'ईफ्फी'नी नाकारला पण 'NYIFF'ने स्वीकारला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |



 
रवी जाधव या हरहुन्नरी दिग्दर्शकाने तयार केलेल्या 'न्यूड' चा मराठी चित्रपटाच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपूर्वी सिनेसृष्टीत वादळ निर्माण झाले होते. गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ( ईफ्फी) ऐनवेळी वगळण्यात आला होता. त्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या, वाद झाले पण अखेर 'न्यूड' ईफ्फीमध्ये दिसलाच नाही. पण आता नामवंत अशा इंडो अमेरिकन आर्ट कौंसिलच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'ची सुरुवातच 'न्यूड' चित्रपटाने होणार आहे.
 
 
चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी ही बाब आज अधिकृतरीत्या ट्विटरवर जाहीर केले. येत्या ७ मे रोजी 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'ची न्यूडने सुरुवात होणार असून १२ मे रोजी 'ओमर्ता’या चित्रपटाने होणार आहे. हंसल मेहता यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून राजकुमार राव त्यामध्ये प्रमुख भूमिका करत आहे. तसेच या मोहत्सवात श्रीदेवी व शशी कपूर यांना आदरांजलीही वाहिली जाईल.
 
 
 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये ओपनींग चित्रपटाचा मान मिळवणारा न्यूड हा पहिलाच मराठी चित्रपट आहे, असाही जाधव यांनी नमूद केलं आहे. येत्या २७ एप्रिलरोजी न्यूड सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत या चित्रपटाची एक झलक...  
 
 
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@