जि.प.च्या अर्थसंकल्पास उद्या मिळणार मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

पाणीपुरवठा, कृषी विभागासाठी वाढीव तरतूद


जळगाव :
जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. यात २५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, येत्या विशेष सभेत या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात येणार आहे. यानिमित्त प्रशासनातर्फे विभागनिहाय निधीचे नियोजन करण्यात आले आहे. यात शिक्षण, पाणीपुरवठा आणि कृषी विभागात एकूण ६० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अर्थसंकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून, २३ रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत यास सादर करुन मंजुरी देण्यात येणार आहे.
 
 
जि. प. च्या उपकर अनुदान, वाहनकर, उपकर सापेक्ष अनुदान, पाणीपट्टी, जिल्हा निधीतून मिळणारे व्याज यातून मिळणार्‍या स्वत:च्या उत्पन्नातून जि. प. अर्थसंकल्पाचे नियोजन केले जाते. या अर्थसंकल्पात विषयानुसार निधीची तरतुदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागाकडून आलेल्या कामांची आवश्यकता जाणून घेत प्रत्येक विभागाला असलेल्या निधीनुसार कामांचे नियोजन करण्यात आले.
 
 
शिक्षण विभागात दोन लाख रुपये वाढीव तरतुदीसह एकूण ६१ लाख ५० हजार रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार एक लाख, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक १ लाख ५० हजार, तालुकानिहाय शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दोन लाख, शाळा डिजिटल २० लाख, विज्ञान प्रदर्शन १ लाख, न्यायप्रविष्ट खटल्यांसाठी वकील फी ८ लाख, प्राथमिक विभागात शिष्यवृत्ती परीक्षा फी व मार्गदर्शक पुस्तिका २० लाख, स्काऊट गाईड ३ लाख, वेतनेत्तर १ लाख, जि.प. विद्यानिकेतन सादील खर्च ४ लाख यानुसार तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्ता परीक्षण ३५ लाख ९० हजार, आरोग्यासाठी ३८ लाख ५० हजार, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी १० लाखाच्या वाढीव निधीसह ४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याणसाठी २ कोटी, महिला आणि बालविकास १ कोटी १० लाख, पशुसंवर्धन ८० लाख, पाटबंधारे २ कोटी ६९ लाख, कृषीसाठी ३० लाखांच्या वाढीव तरतुदीसह एकूण १ कोटी ४० लाख, पशुसंवर्धन १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@