प.बंगालमध्ये अमित शाह यांच्या सभेला नकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

कोलकत्ता : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या पश्चिम बंगालमधील सभेला येथील राज्य सरकारने विरोध केला आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या ममता सरकारने शाह यांच्या सभेला परवानगी नाकारली असून राज्यात सर्वत्र शाह यांच्या सभेला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याला केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी ममता सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून 'भारत हा एक स्वतंत्र देश असून शाह हे देशात कोठेही सभा घेऊ शकतात' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये या वर्षी येऊ घातलेल्या पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी शाह हे येत्या ९ तारखेला कोलकत्तामध्ये एक सभा घेणार होते. यासाठी प्रदेश भाजपने कोलकत्तामधील नेताजी इनडोअर स्टेडियम हे सभेसाठी घेण्याचे ठरवले होते. परंतु राज्य सरकारने याला नकार देत, शाह यांच्या सभेसाठी राज्यात कोठेही जागा देण्यास नकार दिला आहे. यावर प.बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत, ममता राज्यात हुकुमशाही चालवत असल्याचा आरोप केला होता.
यावर अनंत कुमार यांनी देखील ममता सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे.' भारत हा एक स्वतंत्र देश आहे. त्यामुळे शाह हे देशात कोठेही आणि कधीही सभा घेऊ शकतात.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच ममता सरकारने जरी कितीही विरोध केला, तरी देखील शाह यांची प.बंगालमध्ये सभा होणारच, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@