जागतिक जल दिनानिमित्त क्रिकेटपटू रोहित शर्माचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
पंतप्रधानांनी देखील केले जल संरक्षणाचे आवाहन 
 
 
 
 
आज जागतिक जल दिन आहे. यानिमित्ताने जगभरातून अनेक लोक आपली मतं मांडत आहेत. त्याप्रमाणेच भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने देखील आपल्या आयुष्यातील एक प्रसंग सांगत आजच्या दिनानिमित्त पाणी वाचवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
 
"काही महिन्यांआधी मी केप टाऊन येथे गेलो होतो, त्यावेळी लक्षात आले की आपण ज्या पाण्याला गृहीत धरतो, ते पाणी आता अमाप प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे पाणी वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहीजे." अशा भावना त्याने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. 
 
 
 
 
 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आजच्या दिवशी पाण्याचे महत्व सांगत आपल्या पुढील पिढीला पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असा संदेश दिला आहे. तसेच जेव्हा पाण्याचे रक्षण करण्यात येते त्यावेळी त्याचा सगळ्यात जास्त लाभ आपल्या शहराला, गावांना आणि त्याहूनही जास्त अहोरात्र मेहनत करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना होतो असेही त्यांनी सांगितले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@