वीर जिजामाता उद्यान प्रशासन प्राण्यांची देवाण घेवाण करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 

 
मुंबई : वीर जिजामाता उद्यान प्रशासन प्राण्यांसाठी सात नवीन पिंजरे उभारणार आहे. परंतु पालिकेकडे काही प्राणी नाहीत त्यामुळे इतर प्राणी संग्रालयातून प्राण्यांची देवाण घेवाण केली जाणार आहे. याबाबत प्रशासनाने पत्रव्यवहार सुरु केला आहे.
 
या पिंजऱ्यामध्ये दोन वाघसाठी, सिंहासाठी एक, निलगायसाठी एक, तीन हरिणांसाठी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ५५ कोटी खर्च केले जाणार आहेत याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. यावर भाजपचे गटनेते मनोज कोटक म्हणाले की, पालिका त्याच चुकीची पुनरुवृत्ती करत आहे. कंत्राट देताना मागील चुकांपासुन धडा घेऊन काळजीपूर्वक कंत्राट द्यावे.
 
याबाबत वीर जिजामाता उद्यानचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयांशी प्राण्यांची देवाणघेवाणीच्या बाबत बोलणे सुरु केले आहे. सिंहाबाबत गुजरातमधील जुनागडशी बोलणे झाले आहे तर हरिणांबाबत कानपुर प्राणिसंग्रहालयाशी बोलणे झाले आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या नियमानुसार हे पिंजरे बांधण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@