मेट्रो चालवायला हवी पण मेट्रोच्या कामास विरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

शिवसेनेची दुटप्पी भूमिका
भाजपचा आरोप

 
 
 
 
मुंबई : मेट्रो सुरु झाली तेव्हा शिवसेनाच्या वतीने मेट्रो बेस्टला चालवायला द्यावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु आज मेट्रोच्या प्रस्तावांना विरोध केला जात आहे. हि शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे असा आरोप भाजपने केला आहे.
 
मेट्रो जेव्हा सुरु झाली त्यावेळी तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे त्यानंतर यशोधर फणसे यांनी मेट्रोचे व्यवस्थापन बेस्टला देण्यात यावे अशी मागणी केली होती परंतु आज मेट्रोच्या विविध प्रस्तावांना शिवसेना विरोध करत आहे. एकीकडे व्यवस्थापन देण्याची मागणी करायची तर दुसरीकडे कामाला विरोध करायचा असे केल्यास मेट्रोचे काम कसे होणार. असा सवाल भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सभागृहात अर्थसंकल्पच्या भाषणावेळी विचारला.
 
घाटकोपर ते व्हर्सोवा मेट्रो सुरु केल्यामुळे नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. या मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापन रिलायन्सकडे आहे परंतु पुढील मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापन सरकारकडे राहणार आहे. मेट्रोचे व्यवस्थापन बेस्टला द्यायचे असेल तर आधी मेट्रो प्रकल्पाचे काम तरी होऊ द्या त्यामध्ये राजकारण आणू नका असे आवाहन मनोज कोटक यांनी केले. तसेच प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणे नगरसेवक निधीतून कचऱ्याचे डबे उपलब्ध करून दिले जातात त्याप्रमणे नगरसेवक निधीतून कापडी पिशव्या दिल्या जाव्यात. पीआरपीच्या घरांचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे, मुंबईतील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा केला जावा आदी मागण्या त्यांनी केल्या.
 
७०० फुटांच्या घरांना करमाफी
 
शिवसेनेने ५०० फुटांच्या घराला करमाफी द्यावी तसेच ५०० ते ७०० फुटांच्या घरांना ६० टक्के करमाफी द्यावी अशी मागणी केली होती परंतु ७०० फुटापर्यंतच्या सर्व घरांना १०० टक्के कर माफी द्यावी, अशी मागणी मनोज कोटक यांनी सभागृहात केली.
 
@@AUTHORINFO_V1@@