शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा जास्त दिवस चालणार नाही - तटकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : सत्तेत आहोत आणि विरोधातही अशी करमणूक करण्याचे शिवसेनेचे दिवस आता संपले आहेत. त्यांचा हा बिनपैशाचा तमाशा आता जास्त दिवस चालणार नाही अशा शब्दात आमदार सुनिल तटकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेतला. राज्यातील अंगणवाडी सेविकांना लावलेल्या ‘मेस्मा’ कायदयावर ते बोलत होते.
 
अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याचा आत्मघातकी निर्णय मागे घेतल्याबद्दल तटकरे यांनी सरकारचे अभिनंदन केले. मात्र, मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला, तेव्हा शिवसेनेने मूकसंमती दिली. आता सभागृहात ते विरोधी भूमिका घेत असून हा दांभिकपणाचा कळस असल्याचे ते म्हणाले.
 
राजदंड पळवणाऱ्या सदस्यावर कारवाई कधी?
 
बुधवारी दोन्ही सभागृहात अंगणवाडी सेविकांवरील मेस्मावरून गदारोळ झाला. तेव्हा एका सदस्याने सभागृहातील राजदंड पळवला. सरकार त्या सदस्यावर काय कारवाई करणार ? याकडे आपले लक्ष असल्याचे तटकरे म्हणाले.
 
... ते पाप कुणाचे?
बुधवारी झालेल्या भाषणांमधून काँग्रेस - राष्ट्रवादीचे हे पाप असल्याचे सांगितले गेले. मग मागच्या वर्षी २४ दिवसांच्या संपात बालकांचे मृत्यू झाले, ते कुणाचे पाप होते ? असा सवालही तटकरे यांनी केला.
 
@@AUTHORINFO_V1@@