माहीम नेचरपार्क प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून दिशाभूल : राम कदम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : मुंबईतील माहीम नेचरपार्कमध्ये कोणतेही बांधकाम करण्याचा प्रस्ताव नसतानाही हे पार्क बिल्डरला देण्याचा डाव असल्याचा शिवसेना पक्षनेते आदित्य ठाकरे यांचा आरोप हा लोकांची दिशाभूल असल्याची टीका भाजप प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केली.
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाने माहीम नेचर पार्कमध्ये कोणत्याही बांधकामाला परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले असूनही आदित्य ठाकरे यांनी जनतेची दिशाभूल करत माहीम नेचर पार्क बिल्डरच्या घशात घालत असल्याचा आरोप केला आणि त्याच्या विरोधात सह्यांची मोहीमही राबवली हे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले. वस्तुस्थिती समजून न घेताच एखाद्या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे आरोप करणे आणि सह्यांची मोहीम राबविणे योग्य नाही, राम कदम म्हणाले.

 
धारावी पुनर्विकास प्रकल्पातर्फे हे लेखी स्पष्ट करण्यात आले आहे की, माहीम नेचर पार्क हे दीर्घकाळापासून धारावी 'नोटिफाईड एरिया'चा भाग आहे. जो बदल प्रस्तावित केला आहे त्यामध्ये जमिनीच्या वापरामध्ये कोणताही बदल होणार नाही. केवळ या क्षेत्राचा समावेश धारावी विकास योजनेत करण्यात येणार आहे. तथापि, धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना माहीम नेचर पार्कमध्ये कोणत्याही बांधकामाला परवानगी देण्याचा प्रस्ताव नाही, असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@