सातपुड्यात लागणार्‍या आगींसह अतिक्रमणाच्या गुन्ह्यांची चौकशी करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 

आडगावच्या जंगल बचाव संस्थेची मागणी


 
जळगाव :
यावल वनविभागातील सातपुडा जंगलामध्ये लावल्या जाणार्‍या आगी थांबाव्यात आणि वनविभागाच्या जागेवरील अतिक्रणाच्या गुन्ह्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी चोपडा तालुक्यातील आडगाव येथील जंगल बचावचे प्रमुख संत बाबा महाहंसजी महाराज यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
निवेदनात नमूद केले आहे की, आगींमुळे उजाड होत असलेल्या सातपुडा जंगलावर होणारे भविष्यातील दुष्परिणामांचे गांभीर्य आज प्रशासनाला दिसून येत नाही. याची फार मोठी खंत वाटते. यात वाघझिरा वनपरिमंडळ ते कुंड्यापाणी वनपरिमंडळमधील सातपुड्याच्या डोंगराची जास्त प्रमाणात आगी लावून हानी करण्यात आलेली आहे. या आगी लावण्यामागील आणि त्या सुरू राहण्यामागील गौडबंगाल काय याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
 
 
डिंकाच्या झाडापर्यंत जाण्याचा मार्ग सुरळीत करण्याच्या हेतूने, तसेच दाहकतेच्या उष्णतेने झाडातून डिंक जास्त मिळण्याच्या हेतूने वन माफिया जंगलात सुनियोजितपणे आग लावतात. डिंक संकलन करणारा हा माफिया मध्य प्रदेशातील आणि महाराष्ट्रातील आदिवासी लोकांना वनहक्काचा गैरफायदा घेण्याखाली वनजमिनी विकण्याचा बेकायदा उद्योगही करतो. याबाबत सरकारने सक्तीचे कठोर नियम करुन त्वरित सातपुड्यातील आगींना थांबवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
 
 
निवेदनावर जंगल बचाव संस्था राष्ट्रीय अध्यक्ष बाबा महाहंसजी महाराज, देवगोपालजी महाराज, कृष्णा दिलीप पाटील, ज्ञानेश्‍वर महाराज, दत्तात्रय महाराज, सुनील महाराज, गणेश नामदेव कोळी, कैलास पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, जयेश सुर्यभान पाटील, प्रमोद संतोष पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 

लक्ष का नाही? - मनुदेवी परिसरातील सातकाबरा, गायवाडा डोंगरात लागलेल्या आगी थांबविण्यासाठी बाबा महाहंसजी महाराज आणि वन समितीच्या सदस्यांवरच वनपालांनी खोटे आरोप करुन तुम्हीच या जंगलात आगी लावतात असा आरोप केला आहे. सातपुड्याच्या शाश्‍वत वृक्षवल्लीची आग लावून केली जात असलेली राखरांगोळी थांबविण्याकडे वनविभागाचे लक्ष का नाही? जर याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असेल तर करोडो रुपये खर्च करुन वृक्षलागवड केलेल्या वृक्षांची देखभाल करणार कोण? ही बाब गंभीर आणि चिंतनाचा आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@