कोस्टल रोड सल्लागारांसाठीच्या प्रस्तावाला स्थायी समितीचा हिरवा कंदील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका १५ हजार कोटी रुपये खर्चून पहिल्या 'कोस्टल रोड'चे काम हाती घेणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतच्या कामाच्या दोन पॅकेजसाठी दोन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या प्रस्तवाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे.
 
मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात यावर भर दिला होता. कोस्टल रोडसाठी दोन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी १०८ कोटी १४ लाख ४० हजार १५३ रुपये खर्च केले जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पॅकेज एकमध्ये प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस आणि पॅकेज दोनमध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडचे टोक असे काम केले जाणार आहे.
 
 
पॅकेज एकसाठी ५० कोटी ५२ लाख ८० हजार १५३ रुपये खर्च करून मे. लुईस बर्जर कन्सल्टिंग प्रा. लि. तर पॅकेज दोनसाठी ५७ कोटी ६१ लाख ६० हजार रुपये खर्च करून मे. इजिस इंडिया कन्सल्टिंग इंजिनिअर्स, मे. कलिन ग्रुमिट आणि रो (युके) लि. या कंत्राटदार कंपनीला दिले जाणार आहे.
 
मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर नरिमन पॉईंट ते मालाड मार्वे पर्यंत ३५ किलोमीटरचा कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. या कोस्टल रोडच्या कामासाठी किनारपट्टीलगतच्या काही भागात भराव टाकून रस्ता बांधणे, काही भागात पूल आणि उन्नत मार्ग तर काही भागात बोगदे बांधण्यात येणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@