रेशम क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर सरकारचा भर : स्मृती इराणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : रेशम क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्यावर तसेच वाढवण्यावर सरकारचा जास्त भर आहे अशी माहिती केंद्रीय कापड आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
 
जेव्हा बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या वस्तू येतील तेव्हा बाजार पेठ देखील वाढेल आणि यासाठी भारत सरकार रेशम क्षेत्रातील पायाभूत सुविधेवर ८० टक्के खर्च करेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रासोबत राज्यातील रेशम व्यवसायाला प्रगत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी वेब-आधारित संकेतस्थळ निर्माण केले जाईल. तसेच बीज उद्पादकांना देखील मदत पुरविली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
बाजारपेठेला ध्यानात घेवून विशेष लक्ष दिले जाईल. रेशम व्यवसायात जे शेतकरी काम करीत असतील त्यांना एक मदत क्रमांक दिला जाईल. सध्या भारतात ८ रेशम केंद्र आणि १९ रेशम उद्पादन केंद्र बनविले जातील. मात्र रेशम क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवणे हे सरकारचे मुख्य ध्येय असेल असेही त्या यावेळी म्हणाल्या. 
 
@@AUTHORINFO_V1@@