वैचारिक आक्रमण होऊनही संस्कृती अबाधित : प्रा. गौरीशंकर धुमाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 

पाचोरा :
भारतीय संस्कृतीला गौरवशाली परंपरा आहे. त्यामुळे या संस्कृतीवर कितीही वैचारिक आक्रमणे झाली तर संस्कृती अबाधित राहील, असा दृढ विश्‍वास प्रा.गौरीशंकर धुमाळ यांनी व्यक्त केला.
 
 
पाचोरा येथील नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त ‘गौरवशाली भारताची परंपरा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर रामचंद्रदास महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक मनीष काबरा यांची उपस्थिती होती. व्याख्यानापूर्वी नादब्रह्म विद्यालयाचे संगीत विशारद गोविंद मोकाशी व त्यांच्या चमूने सांस्कृतिक कार्यक्रमात सदाबहार गीते सादर करत मैफिल रंगवली. यावेळी नववर्ष स्वागत समितीतर्फे उल्लेखनीय कार्य करणार्‍या शहरातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. नगराध्यक्ष संजय गोहील यांच्या हस्ते भव्य गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. महिलांनी दुचाकी रॅली काढली होती.
 
 
प्रा. धुमाळ पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीला बलशाली परंपरा आहे. परंतु, वैचारिकता घसरलेले काही लोक त्यास खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी संस्कृतीचे पालन केले पाहिजे, असे आवाहनही प्रा. धुमाळ यांनी विविध दाखले व संदर्भ देत केले. या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
 
@@AUTHORINFO_V1@@