नगरसेवकांच्या विरोधानंतरही नाले सफाईचा प्रस्ताव मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : मुंबईतील नालेसफाईतील गाळ कुठे टाकणार, त्याचे वजन कसे करणार आदी प्रश्न नगरसेवकांनी स्थायी समितीत या नालेसफाईच्या प्रस्तावावेळी विचारले त्यावर प्रशासनाने ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी या प्रस्तावला तीव्र विरोध केला.
 
नाल्यातील गाळ काढून डंपिंगवर टाकल्यानंतर त्याची व्हिडीओग्राफी करा, अशी जोरदार मागणी केली. परंतु विरोधानंतरही स्थायी समितीचे अध्यक्ष भाऊ कोरेगावकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. दोन वर्षांपूर्वी नालेसफाईमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. याप्रकरणात काही अधिकारी आणि कंत्राटदारांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. परंतु एवढी कारवाई होऊनही नालेसफाईच्या कामात सुधारणा झाल्याचे दिसत नाही.
 
भाजपचे मनोज कोटक यांनी नाल्यातील गाळ काढल्यानंतर तो गाऴ कुठे टाकणार, त्याचे वजन कसे करणार तसेच कोणत्या अनुभवाच्या निकषावर कंत्राट देण्यात आले असा, प्रश्न विचारला. यावर प्रशासनाला सकारात्मक उत्तर देता आले नाही. यापूर्वी घोटाळा होऊनही प्रशासनाने निविदा काढताना काळजी घेतलेली नाही. गाळ काढल्यानंतर ज्या डंपिंगवर गाळ टाकला जाणार आहे तेथील व्हिडिओग्राफी करणार का? यावरही प्रशासनाला सकारात्मक उत्तर देता आले नाही. जेथे गाऴ टाकला जाणार आहे, तेथील व्हिडीओग्राफी करा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र तरीही प्रशासनाने ठोस उत्तर दिले नाही. अखेर विरोधानंतरही प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान अशाच प्रकारच्याच दुस-या प्रस्तावात १५ टक्के जास्तने निविदा काढण्यात आल्या होत्या. यावेळी कोणत्या अनुभवाच्या निकषावर कंत्राट देण्यात आले याबाबतची उपसूचना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी मांडली. मात्र याही प्रश्नाला प्रशासनाला उत्तर देता आलेले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी फेटाळण्यात आला. नालेसफाई करताना अद्याप यंत्रणेत प्रशासनाने सुधारणा न केल्याने यंदाही नालेसफाईच्या कामांवर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@